पाचोरा तालुक्यातील वेरूळी बुद्रुक येथील सर्पदंशाने ५८ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. जळगाव प्रतिनिधी शेख जावीद (संपादक -:- हेमकां...
पाचोरा तालुक्यातील वेरूळी बुद्रुक येथील सर्पदंशाने ५८ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.
जळगाव प्रतिनिधी शेख जावीद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाचोरा तालुक्यातील वेरूळी बुद्रुक येथील रहिवासी पितांबर त्रंबक पाटील (वय .५८) हे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात काम करत असताना त्यांना काहीतरी चावल्या सारखे जाणवल्याने तात्काळ ते घरी आले असता त्यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा पुर्वीच पितांबर पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पितांबर पाटील यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा व विवाहित तीन मुली असा परिवार आहे. अत्यंत शांत व कष्टकरी पितांबर पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने वेरूळीसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचेवर वेरूळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहेत.
No comments