adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाशी वाद घालणे पडले महागात एकावर तोफखान्यात गुन्हा दाखल

  शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाशी वाद घालणे पडले महागात एकावर तोफखान्यात गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्या...

 शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाशी वाद घालणे पडले महागात एकावर तोफखान्यात गुन्हा दाखल

सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.७ ):- शहरातील डीएसपी चौक येथे शहर वाहतूक शाखेचे पोहेकॉ/संजय बाजीराव दळवी हे दि. ०७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.५० वाजता वाहतुक नियमन करत असतांना मोटार सायकल क्रमांक एम.एच.१६ डी.डी. ७४०५ चे मालक/चालक हे सिग्नल तोडुन जात असतांना पोहेकॉ.दळवी यांनी त्यांचे मोटार सायकलवर ऑनलाईन ई-चलन दंडाची कारवाई केली.ऑनलाईन दंडाचा मेसेज मालक/चालक यांना आल्यावर ते वाहन चालक परत डी.एस.पी.चौक येथे येवुन पोहेकों.दळवी यांच्या सोबत वाद घालुन सरकारी कामात अडथळा केला त्यामुळे संजय सर्जेराव म्हस्के (वय ५५ वर्षे रा.टाकळी काझी ता.जि.अहिल्यानगर) यांचेवर भा.न्या.सहिंता २२१ कलमान्वये रितसर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असुन त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे.शहर वाहतुक शाखेचे प्रमुख पो.नि. बाबासाहेब बोरसे यांनी जनतेस अवाहन केले आहे की, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे, वाहतुक पोलीस आपले सुरक्षेसाठी असून त्यांना सहकार्य करावे त्यांच्याशी वाद घालू नये. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांविरुध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे वाहतूक पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी सांगितले.

No comments