मावा विमल तंबाखूजन्य पदार्थ चोरून विक्री करणाऱ्यांवर छापा: तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त: MIDC पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाची संयुक...
मावा विमल तंबाखूजन्य पदार्थ चोरून विक्री करणाऱ्यांवर छापा: तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त:MIDC पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाची संयुक्त कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१३ फेब्रुवारी):- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची चोरून विक्री करणाऱ्या इसमानवर एमआयडीसी पोलिस व अन्न औषध प्रशासनाने कारवाई करत तब्बल २ लाख ७६ हजार ८०० रु.मुद्देमाल जप्त केला आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,राजेंद्र शामराव वराट,आनंद तात्या खैरे (रा. निंबळक) हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थापासून मावा तयार करून त्याची चोरून विक्री करत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सपोनी/ चौधरी यांनी अन्न औषध प्रशासनाला याची माहिती देऊन त्यांच्या सोबत निंबळक येथे जाऊन छापा टाकला असता तेथे काही इसम मावा,विमल,सुगंधित तंबाखू विकताना आढळून आले.त्यामुळे राजेंद्र शामराव वराट,आनंद तात्या खैरे,अमोल धोंडीराम इंगोले,महेश भीमराव घोलप सर्व (रा.निंबळक तालुका जिल्हा अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 86/2025 भारतीय न्याय संहिता कलम 223,274,275,123,(3)(5) सह अन्नसुरक्षा अधिनियम कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई/विनोद परदेशी हे करत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले,एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोसई/विनोद परदेशी,पोलीस अंमलदार राजू सुद्रिक,नितीन उगलमुगले,साबीर शेख, नंदकिशोर सांगळे,पोहेकॉ/कावरे,मपोहेकॉ/सूर्यवंशी,महेश बोरुडे,किशोर जाधव,नवनाथ दहिफळे,उमेश शेरकर,तसेच अन्न औषध प्रशासन विभागाचे राजेश बडे,अन्नसुरक्षा अधिकारी शुभम भस्मे,सागर सोनार यांनी केली आहे.

No comments