Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

CK अण्णा' यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन

 CK अण्णा' यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन  कासार सिरसी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आप्पासाहेब मूळजे पत्रकारिता क्षेत्रातील 'शहेनश...

 CK अण्णा' यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन 


कासार सिरसी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आप्पासाहेब मूळजे पत्रकारिता क्षेत्रातील 'शहेनशहा' आपल्या प्रभावशाली कर्तुत्वामुळे 'Ck अण्णा' या सुप्रसिद्ध ब्रँड नावाने ओळखले जाणारे धडाकेबाज झुंजार स्टार पत्रकार चंद्रशेखर केंगार (CK अण्णा) यांच्या कासार सिरसी येथे दैनिक समतेचा आवाज या प्रेस मीडिया कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. सरपंच प्रतिनिधी नारायण डोंबाळे व उपसरपंच विरेश (अप्पू) चिंचनसुरे यांच्या हस्ते रिबीन कापून नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कासार सिरसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड उपस्थित होते.


'सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांचा हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचा पत्रकार बांधवातर्फे सत्कार करण्यात आला.आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन. न्यूज 24 संलग्नित माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड व दैनिक समतेचा आवाज या नूतन प्रेस कार्यालय उद्घाटनच्या औचित्याने चंद्रशेखर केंगार (Ck अण्णा) यांचा प्रमुख


मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.मनोगत व्यक्त करताना चंद्रशेखर केंगार म्हणाले की पत्रकारिता क्षेत्रात माझ्या जडणघडणीत सर्वांत प्रमुख वरदहस्त असलेले माझे महागुरू जेष्ठ पत्रकार श्यामजी मुळजकर व पत्रकार संभाजी पुरी गोसावी साहेब (सातारा )यांचे मला अमूल्य मार्गदर्शन लाभले, लाभतसेच माझ्या सावली सारखे नेहेमी सोबत राहून वेळोवेळी मदत करणारे संजीव फोटो स्टुडिओचे सर्वेसर्वा संजीव यादव यांचं पण खूप सहकार्य केले.पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून सर्वसामान्याच्या उद्धारासाठी मी नेहमी तत्पर्य असेल.त्यानंतर अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत चंद्रशेखर केंगार यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी वाडी सिरसी सरपंच बालाजी मंडले,ग्रामपंचायत सदस्य सुरेश बरकंबे,पृथ्वीराज सरवदे,गिरीश चिंचनसुरे,भास्कर पाटील,जेष्ठ पत्रकार श्यामजी मुळजकर,शीघ्र कवी किशोरचंद देवसाळे,संपादक अप्पासाहेब मुळजे,पोलीस फ्लॅश न्यूज बालाजी मिलगिरे,दर्शन पोलीस टाईम्स रायप्पा मंडले,किरण किवडे,संजीव भोसले,मधुकर केंगार,अनिल केंगार,उद्धव माने,संजीव यादव, इस्माईल घाटे,शंकर स्वामी आदी उपस्थित होते. 

No comments