यावल येथील बारा गाड्या उत्साहात परिसरात आले यात्रेचे स्वरूप भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) साला बादाप्रमाणे यंद...
यावल येथील बारा गाड्या उत्साहात परिसरात आले यात्रेचे स्वरूप
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
साला बादाप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील म्हसोबा मंदिराच्या बारा गाड्या ओढडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला दिनांक 30 मार्च रोजी यावल शहरातील म्हसोबा येथील बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस संध्याकाळी ठीक सहा वाजता म्हसोबा मंदिर येथे विधिवत पूजा करून बारा गाड्या ओढण्यास सुरुवात करण्यात आली सदरील बारागाड्या ह्या बोरावल रस्त्यापासून ते म्हसोबा मंदिरापर्यंत ओढण्यात आल्या यावेळेस भगत म्हणून राहुल चौधरी तर बगडे म्हणून मनोज माळी व संदीप सोनवणे हे होते
यावेळेस शहरातील परिसरातील नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस परिसरामध्ये यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचा चोक बंदोबस्त होता सदरील बारा गाड्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले
No comments