मनवेलच्या श्री भुवनेश्वरी आश्रमात होणार शतंचण्डी यज्ञाचे आयोजन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : तालुक्या...
मनवेलच्या श्री भुवनेश्वरी आश्रमात होणार शतंचण्डी यज्ञाचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील मनवेल येथील श्री भुवनेश्वरी आश्रमात श्रीराम नवमी निम्मत यावर्षी शतंचण्डी यज्ञाचे आयोजन २ एप्रिल २५ बुधवार पासुन आयोजन करण्यात आले आहे. मनवेल गावापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुवनेश्वरी आश्रम गुजरात सौराष्ट्र येथे एक असून दुसरे मनवेल येथे आहे. श्री भुवनेश्वरी आश्रमाची स्थापना १९४२ साली श्री बनवारीदास बाबा यांनी मंत्र शक्तीने अग्नी प्रज्वलीत करून अखंड धुनी चालु केली होती ती आज ८३ वर्षांपासून सुरूच आहे. २ एप्रिल बुधवार पासुन अकरा शतंचण्डी यज्ञला प्रारंभ होणार असून अकरा ब्राम्हणांच्या उपस्थित पार पडणार आहे. २ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान सप्तशती पाठ चे आयोजन व एप्रिल रोजी पुर्णाहुती , पुजा होम हवन व दुपारी १२ वाजे नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. भावीकांनी कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी महाराज पाटील यांनी केले आहे.
No comments