एसीबीचा सापळा रावेर भूमी अभिलेख कार्यालयाचा भूकरमापक ४ हजारांची लाच घेताना अटक निंभोरा पोस्टेला गुन्हा दाखल जमीन मोजणीसाठी मागितली पैसे अ...
एसीबीचा सापळा रावेर भूमी अभिलेख कार्यालयाचा भूकरमापक ४ हजारांची लाच घेताना अटक निंभोरा पोस्टेला गुन्हा दाखल
जमीन मोजणीसाठी मागितली पैसे अथवा हरभराची लाच
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील भूअभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पथकाने रंगेहाथ पकडले आहे. महीनाभरापुर्वी रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या कारभाराबाबत रावेर तहसील कार्यालयात आढावा बैठकीत मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या समोर संबंधित कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी नागरिकांकडून कामाच्या बदल्यात अवाजवी पैशाची मागणी करीत असल्याचे आरोपासह गार्हाने बैठकीत मांडले होते आमदार महोदयांनी बैठकीतूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत जागरूक करीत तक्रार केली होती आणि भूअभिलेख कार्यालयातील कर्मचार्यांनी पारदर्शक कार्य करण्यासाठी तंबी ही दिली होती. मस्कावद येथील तक्रारदार शेतकरी यांनी अर्ज करुन जमीन मोजणीसाठी शासकिय फी भरली होती. त्यानंतर राजेंद्र रमेश कुलकर्णी, वय ४८ पद-भूकरमापक, भूमी अभिलेख कार्यालय, रावेर धयांनी दि. १८/२/२५ रोजी प्रत्यक्ष शेतात येवून जमिनीचे मोजमाप केले होते. त्यावेळी राजेंद्र कुलकर्णी यांनी तक्रारदार याना केलेल्या मोजमाप च्या खुणा दाखविण्यासाठी ५५०० रुपयाची मागणी स्वतःसाठी केली होती. तेंव्हा तक्रारदार यानी पैसे नसल्याचे सांगितल्यावर राजेंद्र कुलकर्णी यानी शेतात
चण्याचे (हरभरे) पिक आहे पैशांच्या बदल्यात चणें दे असे सांगितले होते. तक्रारदार याना पैशे अगर चणे (हरभरे) देण्याची इच्छा नसल्याने त्यानी दिनांक ४/३/२५ रोजी लाच प्रतिबंधक कार्यालय जळगाव येथे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी
दिनांक: 4/3/25
२५/३/२५ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात कुलकर्णी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतीच्या
मोजमाप केलेल्या कामाचे खुणा दर्शवून सीमा निश्चिती करण्यासाठी प्रथम ५५००,५००० व तडजोड अंती ४०००/रुपयाची मागणी केली तारीखा ४/३/२५ रोजी च्या पडताळणीत पैशे नसतील तर चणे (हरभरे) ची देखील मागणी केली होती. परंतु तक्रारदार याना चणे ( हरभरे) द्यावयाचे नसल्याने त्यानी पैशे देतो म्हणून सांगितले असता त्यानी पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.
त्या अनुषंगाने आज दिनांक २६/०३/२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान प्रथम ५०००/- रुपयाची मागणी करून तडजोडी अंती ४०००/- रुपये लाच रक्कम ठरले. त्यानंतर कुलकर्णी यांनी तक्रारदार यांना निंभोरा येथे एका शेता जवळ बोलवून लाचेची रक्कम ४०००/- रुपये स्वतः स्वीकारली आहे.
राजेंद्र रमेश कुलकर्णी, वय ४८ पद- भूकरमापक, भूमी अभिलेख कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव (वर्ग 3 भुमी अभिलेख) यांना ताब्यात घेण्यात आले असून निभोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
सापळा व पर्यवेक्षण अधिकारी, योगेश ठाकूर. पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव. सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोकों अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
No comments