adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किनगाव गावाजवळ एसटी बस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार ६२ वर्षीय वृध्द ठार

  किनगाव गावाजवळ एसटी बस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार ६२ वर्षीय वृध्द ठार  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : त...

 किनगाव गावाजवळ एसटी बस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार ६२ वर्षीय वृध्द ठार 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : तालुक्यातील किनगाव या गावाजवळ दुचाकी आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी ६२ वर्षीय वृध्द गंभीर जखमी झाला होता तात्काळ त्यांना किनगाव रूग्णालयात नेण्यात आले.त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव ता. यावल या गावाजवळ जळगाव येथून एस.टी. बस क्रमांक एम. एच. १४ बी.टी. २१४४ घेऊन चालक यावल कडे येत होते. दरम्यान किनगाव गावाच्या बाहेर कृषी विद्यालयाच्या समोर एस.टी. बस आणि मोटरसायकल क्रमांक एम. एच. १९ ए.टी. ८५८८ व्दारे किनगाव गावाकडे जात असलेल्या अशोक यशवंत सपकाळे वय ६२ यांचा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या डोक्याला, पायाला जबर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताचं हायवे मृत्युंजयदूत सचिन तडवी, बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, गुड्डू पिंजारी यांनी जखमी अवस्थेत सपकाळे यांना किनगाव रुग्णालयात दाखल केले तेथे डॉ.दर्शना निकम, मोहिनी धांडे, भाग्यश्री भारंबे, सरदार कनाशा यांनी त्यांच्यावर तातडीने प्रथम उपचार केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात देण्यात आले. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भुषण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार सुनील पाटील हे पथकासह दाखल झाले होते. त्यांनी अपघातग्रस्त एसटी बस आणि दुचाकी ही तेथून पंचनामा करून यावल पोलीस ठाण्यात लावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.

No comments