यावल तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची कार्यकारणी जाहीर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र राज्य ...
यावल तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची कार्यकारणी जाहीर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ द्वारा यावल तालुका कार्यकारणी निवड सभा संपन्न झाली.अध्यक्षस्थानी महासंघाचे मार्गदर्शक तथा यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी होते. प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे , जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे, भुसावळ तालुकाध्यक्ष डी.आर. धांडे , मुख्याध्यापक शेख अशपाक, प्रा. मनोज वारके, मुख्याध्यापिका नलिनी पाटील उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे यांनी महासंघाचे कार्य १९८० पासून आजतागायत सुरू असून महासंघाने वेळोवेळी क्रीडा शिक्षकांच्या ,व शारीरिक शिक्षण विषयाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केली. महासंघाच्या वतीने वेळोवेळी केलेल्या सर्व आंदोलनांची माहिती उपस्थित शिक्षकांना दिली व सर्व क्रीडा शिक्षकांनी संघटित राहून आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे यासाठी ही नवीन कार्यकारणी निवडण्यात आलेली आहे असे सांगितले .तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ वाघुळदे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक जयंत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारणी पुढील प्रमाणे- अध्यक्ष - ललित अनंत बढे- सत्कार विद्यामंदिर अट्रावल, उपाध्यक्ष- शेख सलील जलीलउद्दीन - इंदिरा गांधी उर्दू स्कूल यावल, उपाध्यक्ष- पूनम जी कोल्हे - डी एन कॉलेज फैजपुर , सचिव - आर एस जावळे- न्यू इंग्लिश स्कूल भालोद, कोषाध्यक्ष - सुयोग मधुकर पाटील - प्रभात विद्यालय हिंगोणा, सहसचिव -किशोर घनश्याम चौधरी - माध्यमिक विद्यालय वड्री, संघटक - वशिम खान खलील खान - अँग्लो उर्दू स्कूल मारुळ, सदस्य डॉ. नरेंद्र महाले- सरस्वती विद्या मंदिर यावल, अनिकेत काळकर - अकलूद विद्यालय, पंकज भंगाळे - ज्योती विद्यामंदिर सांगवी बुll, संदीप मोरे - डी एच जैन विद्यालय कोरपावली,उल्हास पाटील नूतन विद्यामंदिर अंजाळे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. नरेंद्र महाले यांनी मानले.
No comments