राज्य शिक्षक महामंडळाची सभा संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाची कौन्सिल ...
राज्य शिक्षक महामंडळाची सभा संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाची कौन्सिल सभा आज जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी जळगाव येथे महामंडळाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांचे अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता संपन्न झाली आहे. सभेसाठी शिक्षक आमदार सुधाकर आडबाले , फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे तसेच मराठवाडा , विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत . असे होते सभेपुढील विषय :
मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे.शिक्षण विभागातील प्रलंबित मागण्या/समस्या, शासनाचे धोरण इ. बाबत विचार विनिमय करणे. मागण्या / समस्या संदर्भात आंदोलन करणेबाबत विचार विनिमय करणे. नविन कार्यकारी मंडळ व कॉन्सिल सभेचे (प्रतिनिधी सभा) नामनिर्देशन (गठण) करणे. महामंडळ बळकट करणेबाबत चर्चा करणे. सभेच्या अध्यक्षांचे परवानगीने येणारे अन्य विषय. सभेनंतर दुपारी ४ वाजता एन् .पी.एस्.कर्मचारी यांनी कोणती पेन्शन योजना निवडावी याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
No comments