नूतन मराठा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षे बाबत मार्गदर्शन सत्र संपन्न जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ज. जि. म. वि. प्र. समाजा...
नूतन मराठा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षे बाबत मार्गदर्शन सत्र संपन्न
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज. जि. म. वि. प्र. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक बी.सी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुरुवातीस विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. एन. जे. पाटील यांनी विविध दाखले देऊन एकूण परीक्षा पद्धती बाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आय. क्यू. ए. सी. विभागाचे समन्वयक प्राध्यापक एस. आर. गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी व त्यासाठी प्लॅन बी सुद्धा तयार असावा तसेच महाविद्यालयात असलेल्या ग्रंथालयातील सुविधांबाबत अवगत केले. प्रा. छोटू मावची यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी डॉ. डी. आर. चव्हाण, डॉ. आर. बी. संदानशिव व प्राध्यापक व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments