पवित्र कुराण आणि मानवता मानव ईश्वराची एक महत्वपूर्ण निर्मिती आहे, जेव्हा मानव आपल्यावर सोपविण्यात आलेल्य नैतिक व चारित्रीक उत्तरदायीत...
पवित्र कुराण आणि मानवता
मानव ईश्वराची एक महत्वपूर्ण निर्मिती आहे, जेव्हा मानव आपल्यावर सोपविण्यात आलेल्य नैतिक व चारित्रीक उत्तरदायीत्वास पार पाडतांना व्यवहारीक रुप देतो, तेव्हा त्यास मानवता असे म्हटले जाते. मानवतेत प्रेम, दया, न्याय, स्नेह,
बंधुत्व, मर्यादा, सभ्यता इत्यादी सर्व बाबी समाविष्ट असतात.
पवित्र कुराण ईश्वराकडून (अल्लाह) सर्व मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पाठविण्यात आलेला ग्रंथ आहे. यात मानवांच्या
संपूर्ण जीवनाकरीता मार्गदर्शन आहे. मानवास जगात पाठविण्यामागच्या उद्देशाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मृत्युनंतर काय होईल याबाबत देखील मानवास सावध केले आहे. हा एक उच्चकोटीचा ग्रंथ आहे.
कुराणमध्ये अनेक ठिकाणी स्पष्ट शब्दात या गोष्टीची घोषणा केली आहे की, कुराण कोणत्याही नवीन धार्मिक समुहाचा
संदेश घेऊन जगात आला नाही तर तो लोकांना त्याच मार्गाकडे बोलवित आहे. जो सनातन काळापासून चालत आला
आहे. मानवाने कोणत्याही विशिष्ट जाती, भाषा आणि विविध समुदायांचा उपासक न होता फक्त अल्लाचा उपासक
व्हायला हवे. कुरआन म्हणतो सर्वांचा पालनकर्ता एक आहे. आणि प्रत्येक व्यक्तीस तिच्या कर्मानुसार फळ मिळते.
ईश्वराची उपासना व सदाचार हेच मानवाचे कर्तव्य आहे. धर्माच्याबाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही (कुरआन २:२५६)
प्रेषित मुहम्मद (सं) यांनी रक्तपातास कधीही उचीत ठरविलेले नाही. तुमचा धर्म तुमच्यासाठी आणि माझा धर्म माझ्यासाठी (कुरआन १०८ः ६) निश्चितच ही आयत धार्मिक सहिष्णूतेच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे. कुरआननुसार जो मानव समाजाचे कल्याण करतो तो मनुष्य उत्तम आहे, पृथ्वीवर घमेंडपणात्, चालू नका. तुम्ही पृथ्वीला फाडूही शकत नाही किंवा (कुरआन १७ : ३७) गर्व मानवास नैतिक पतनाकडे नेतो. हा दोष मानव समाजाकरीता
हानीकारक आहे, लोकांनी आपल्यापेक्षा इतर लोकांना निच व हीन समजू नये आणि त्यांच्याशी अमानुष वर्तन करु नये, तरच परस्परीक संबंध व स्नेहसंबंध सहानुभुतीपूर्ण राहतील.
संकलन :- अब्दुल सरदार पटेल, चोपडा
मो.८७६६७४७०९२
No comments