adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहरातील श्री बालाजी रथोत्सव मार्गातील खड्डे डांबरीकरणाने बुजणे शिवसेनेचे मागणी

  यावल शहरातील श्री बालाजी रथोत्सव मार्गातील खड्डे डांबरीकरणाने बुजणे शिवसेनेचे मागणी   मुख्याधिकारी यांना निवेदन देताना शिवसेनेचे शहर प्रमु...

 यावल शहरातील श्री बालाजी रथोत्सव मार्गातील खड्डे डांबरीकरणाने बुजणे शिवसेनेचे मागणी 

 मुख्याधिकारी यांना निवेदन देताना शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले विभाग प्रमुख पप्पू जोशी ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश वाघ यांच्यासह इतर मान्य वर

 शब्बीर खान/ भरत कोळी यावल प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे)वतीने शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या नेतृत्वाखाली आज यावल नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री गवई साहेब यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात पुढील महिन्यात दि १२/०४/२०२५रोजी यावल शहरात यात्रा असून त्या निमित्ताने श्री बालाजी रथ शहरातून निघत असतो.सदरील श्री रथोत्सव मार्गावर सर्वत्र लहान मोठे खड्डे पडले असून दरवर्षी माती मिश्रित बारीक कच टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र ही कच काही वेळातच वाहनाच्या वर्दळी मुळे निघून जाते व खड्डे आहे तसेच राहतात. त्यामुळे श्री रथास मार्गक्रमणात खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होऊन अनेक अडचणी निर्माण होतात.

तरी यावल शहरातील बेहेडे सूपर शॉप ते नगर परिषद रस्ता,मेन रोड ते बोरावल गेट-देशमुख वाडा-वाचनालय-विठ्ठल मंदिर ते न पा ह्या मार्गावर डांबरीकरणाने येत्या आठ दिवसांत बुजवण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन,उपोषण,धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय.निवेदनावर शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष धोबी,शरद कोळी,पप्पू जोशी,योगेश चौधरी,योगेश राजपूत,प्रकाश वाघ,पिंटू कुंभार,विजू कुंभार,डॉ विवेक अडकमोल,सुनील बारी,हुसेन तडवी,अझहर खाटीक,प्रवीण लोणारी आदीनी मागणी केलेली आहे.

No comments