अशोक शैक्षणिक संकुलामध्ये नदी संवर्धन व ग्राहक दिन उत्साहात साजरा सचिन मोकळं अहिल्यानगर :- संपादक हेमकांत गायकवाड अहिल्यानगर जिल्ह्...
अशोक शैक्षणिक संकुलामध्ये नदी संवर्धन व ग्राहक दिन उत्साहात साजरा
सचिन मोकळं अहिल्यानगर :-
संपादक हेमकांत गायकवाड
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात अशोकनगर येथे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या नेहरू युवा केंद्र, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक पॉलीटेकनिकमध्ये आंतरराष्ट्रीय नदी कृती दिन साजरा करण्यात आला.यावेळी श्री.चंद्रकांत गर्जे,श्री.प्रताप भवार (प्रवीण प्रशिक्षक यशदा पुणे )यांनी आपली नदी आपली जबाबदारी,जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशोक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.
यावेळी श्री.राहुल थोरात यांनी विद्यार्थ्यांना BIS मोबाईल अँप, ग्राहक तक्रार मंच,जागो ग्राहक जागो अशा विविध महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयाचे प्रचार्य श्री. अंजबापू शिंदे,श्री.कोते, उपप्राचार्य श्री.अरुण कडू,महाविद्यालयचे ग्रीन क्लब चे समन्वयक प्रा.बोठे, सर्व विभागप्रमुख,सेवकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments