adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जगदीश मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी व्हा ..... रामदास कालापाड

  जगदीश मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी व्हा ..... रामदास कालापड वाशीम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 जगदीश मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी व्हा ..... रामदास कालापड


वाशीम प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर यांच्या 4 मार्च 2025 रोजी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी रक्तदान शिबिर , खिचडी वाटप , वृक्षारोपण,  फळ वाटप आणि आरोग्य शिबिर सोबतच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे . वाशिम जिल्ह्यातील जगदीश मानवतकर हे गेल्या 2013 पासून वाशिम जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्य करून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवीत आहेत. जगदीश मानवतकर हे कोणत्याही राजकीय पाठिंबाविण्या किंवा कोणत्याही प्रकारचा समाजकारण आणि राजकारण यांचा घरगुती वारसा नसतानाही त्यांनी महाराष्ट्रात आपली एक  वेगळी ओळख निर्माण केली आहे.  ते 2013 पासून दलित अत्याचार तसेच विविध धर्माच्या समाजाच्या व्यक्तींवर अन्याय अत्याचार झाला तर धावून जाणारे व्यक्ती म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जातात . जगदीश मानवतकर हे 2013 पासून रक्तदान शिबिर , आरोग्य शिबिर तसेच सार्वजनिक शिवजयंती,  भीम जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती यांसारख्या विविध प्रकारच्या महापुरुषांच्या जयंतीत कार्य करीत असतात आणि आपले सहयोग देत असतात.  जगदीश मानवतकर यांची ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये कार्यरत असून ते इतर राज्यांमध्ये सुद्धा सक्रिय आहेत . कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक रुग्णांची आणि रहिवाशांची सेवा केली असून ते सपूर्ण महाराष्ट्रात कोरोना योद्धा म्हणून ओळखल्या जातात.  जगदीश मानवतकर हे उत्तम कवी साहित्यिक आणि विचारवंत असून वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून त्यांचे कविता आणि लेख सुद्धा प्रकाशित होत असतात.  अशा मातंग समाजातील एका सामान्य कुटुंबातील युवकाने आपली वेगळी ओळख निर्माण करावी हे खूप कौतुकास्पद आहे.  याचीच प्रचिती म्हणून त्यांचे समर्थक ऑल इंडिया ब्लू टायगर सेना चे सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी यांनी पूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रमाचा आयोजन केले असून त्यांचे समर्थक 4 मार्च रोजी विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहेत.  तरी या विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ऑल इंडिया ब्लू टायगर सेना,  जगदीश मानवतकर समर्थक महाराष्ट्र यांच्यातर्फे करण्यात येत आहे. वाशिम मध्ये रक्तदान शिबिर,  खिचडी वाटप , आरोग्य शिबिर आणि फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रामदास कालापाड यांनी केले आहे.

No comments