कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेगा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरच्या विद्यार्थिनींना ५ लाखांच...
कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेगा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरच्या विद्यार्थिनींना ५ लाखांचे हाय पॅकेज!
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे २४ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह मोठ्या उत्साहात पार पडला. फॉर्च्युन क्लाऊड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित आयटी कंपनीच्या वतीने झालेल्या या भरती प्रक्रियेत विविध शाखांमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील दोन विद्यार्थिनींनी अपूर्व कामगिरी करत ५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळवण्याचा मान मिळवला आहे. सानिका भीका जावरे व कोमल सुरेश माळी या दोघी विद्यार्थिनी डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्स तसेच फुल स्टॅक डेव्हलपमेंट या क्षेत्रातील उच्चस्तरीय पदांसाठी निवडल्या गेल्या आहेत. त्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर त्यांना या कंपनीत प्रवेश मिळाला आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एमसीए, एमसीएस, एमएससी (सीएस), बीसीए, बीएससी (सीएस/आयटी) तसेच बीई/बी. टेक (सर्व शाखा) २०२५ बॅचमधील विद्यार्थ्यांना भरतीची संधी मिळाली. कंपनीने जाहीर केलेल्या नोकरीच्या संधींमध्ये फुल स्टॅक डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, एडब्ल्यूएस/डेव्हऑप्स इंजिनिअर (क्लाऊड कम्प्युटिंग), अँड्रॉईड अॅप डेव्हलपमेंट आणि डेटा सायन्स व अॅनालिटिक्स यांसारख्या नामांकित पदांचा समावेश होता.
निवड प्रक्रियेत तांत्रिक मुलाखत आणि एचआर मुलाखत असे दोन टप्पे होते. उत्कृष्ट गुण आणि प्रभावी कौशल्ये दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये यश मिळवले.
प्लेसमेंटमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय प्रशासनी अभिनंदन करत म्हटले की, "विद्यार्थ्यांनी अशा संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर यश संपादन करावे."
या यशस्वी प्लेसमेंट ड्राईव्हमुळे महाविद्यालयाचा लौकिक अधिकच उंचावला असून, भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.ए. महाजन सर व उपप्राचार्य ए.पी. पाटील सर तसेच संगणक विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या
No comments