adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सामंजस्य करारांतर्गत यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी बनविले ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र

  सामंजस्य करारांतर्गत यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी बनविले ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी  (संपाद...

 सामंजस्य करारांतर्गत यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी बनविले ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      यावल तहसील आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , यावल संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविले शेतकरी ओळखपत्र. मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल आणि यावल तहसील  यांच्यात सामंजस्य करार (MOU) असल्याने   यावल महाविद्यालयातील प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व  यावल तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर  यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी माहिती संच आणि शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचे काम महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी केले. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध लाभाच्या योजने करिता हे शेतकरी ओळखपत्र अत्यंत महत्वाचे असल्यामुळे ते शेतकऱ्यांना भविष्यात महत्त्वाचे ठरेल यासाठी हे ओळखपत्र बनविण्यात आले . सदर कार्यक्रमासाठी उपप्राचार्य.प्रा.एम.डी.खैरनार , उपप्राचार्य डॉ.एस.पी कापडे,प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.हेमंत पाटील,प्रा.प्रशांत मोरे

,प्रा. अक्षय सपकाळे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

No comments