adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दहिगाव येथे होत असलेल बालविवाह प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी रोखला

  दहिगाव येथे होत असलेल बालविवाह प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी रोखला  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल ता...

 दहिगाव येथे होत असलेल बालविवाह प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी रोखला 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील दहिगाव येथील होत असलेला बाल विवाह थांबाविण्यात आला यावल तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती अर्चना आटोळे यांना सकाळी 9:45 ला बाल विवाह होत आहे अशी गोपिनीय  माहिती मिळताच  त्यांनी लगेच कार्यवाही साठी मुलगा व मुलगी यांचे दोघांचे आधार कार्ड मागवून बघितले असता त्यांचे वय अल्प असल्याचे निष्पन्न झाले तेव्हाच अल्पवयीन मुलगा त्याची आई व मुली ला जाब विचारला असता मुलीची आई वडील भाऊ कोणीच नातेवाईक लग्नाला आलेले नव्हते त्या मुळे अधिकच शक निर्माण झाली व तेव्हाच त्यांना यावल पोलीस स्टेशन ला आणून गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर  यांनी बाल विवाह संदर्भत कायदा व होणारी सजा याबद्दल माहिती दिली व पुढील कार्यवाहीसाठी बाल न्याय प्रोटेक्शन अधिकारी श्री कुणाल शुक्ला, श्री प्रतीक पाटील, श्री प्रसन्न बागुल यांच्या ताब्यात देऊन बाल सुधार गृह जळगाव यांच्याकडे यावल पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती सारिका वाणी यांनी मुलीला सोबत घेऊन जळगाव येथे नेण्यात आले तसेच या कार्यवाहीत आधार बहू उद्देशीय संस्था अंमळनेर चे बाल विवाह मुक्त भारत चे यावल रावेर तालुका समन्वयक अशोक तायडे यांनी सहकार्य केले तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी यावल तालुक्यामध्ये  होणारे अल्पवयीन

बाल विवाह ज्या परिसरामध्ये किंवा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांमध्ये बाल विवाह ची गोपनीय माहिती ग्रामस्थांना मिळाली तर त्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्याशी संपर्क साधावा  असे आव्हान केले आहे

No comments