आदिवासी पारधी समाजाच्या बोंबाबोंब आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले,गायरान जमिनीवर अनेक वर्षापासून राहत असलेले आदिवासी पारधी कुटुंबीय...
आदिवासी पारधी समाजाच्या बोंबाबोंब आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले,गायरान जमिनीवर अनेक वर्षापासून राहत असलेले आदिवासी पारधी कुटुंबीयांचे अतिक्रमण रद्द करून जमीन नावावर करण्याची मागणी,
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या नावाखाली आदिवासी कुटुंबांना बेघर करण्याचा ग्रामपंचायतीचे षड्यंत्र
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२७)- अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील मौजे लोणी व्यंकनाथ येथील आदिवासी पारधी समाजाचे अनेक वर्षापासून गायरान जमिनीवरचे अतिक्रमण न हाटवता तिथेच कायमस्वरूपी करून गायरान जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, अध्यक्ष राजेंद्र काळे, अविनाश चव्हाण, मुकेश भोसले, आसाराम काळे, रामसिंग भोसले, मनमास भोसले, रेवण भोसले, युवा भोसले, कानू भोसले, तेजस भोसले, नवनाथ भोसले, अविनाश काळे, अक्षय भोसले, अंकुश काळे आदीसह कुटुंबीय उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी पारधी समाज संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासून लढत असून न्याय हक्क व आदिवासींच्या मुलांचे शिक्षण करीत आहे.हे लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी असून गेली ५० ते ६० वर्षांपासून गायरान जमीन कसुन खात आहे. त्या जमिनीमध्ये कपाशी, आंब्याचे झाडे, बोर व अनेक झाडे असुन शेती करत आहे व ही गायरान जमीन ९ कुटुंब मिळून कसंत आहे काही दिवसापूर्वी तेथील ग्रामसेवक सरपंच यांनी मिळून एक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सौर प्लांट केला व दुसरा सौर प्लांट करण्यासाठी तेथील अतिक्रमण काढण्यासाठी व्यंकनाथ येथील ग्रामसेवक यांनी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याचे नोटीस बजावलेले आहे व नोटीस बजावून फार मोठा अन्याय केलेला असुन ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक आदिवासी पारधी समाजातील लोकांना वेटीस धरून अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी नोटीसा दिलेल्या आहे हे नोटीस देऊन आदिवासी कुटुंबांना बेघर करण्यासाठी षडयंत्र रचले असून तेथील आदिवासी कुटुंब उघड्यावर पडणार आहे. व हे अतिक्रमण नियमितकुल करण्यासाठी वेळोवेळी शासन पत्र दिलेले आहे व त्याचे पीक पाहणी करून सातबारा नावे नोंद करण्यासाठी वेळोवेळी निवेदन दिलेले आहे. शासनाच्या नियमानुसार व १९९० च्या परिपत्रकानुसार गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण नियमानकुल करून ७/१२ व नावे नोंद करण्याचे पारित केलेले असून परिपत्रक महाराष्ट्र शासनाचे आपणाकडे आलेले आहे परंतु त्याची कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सदरील प्रकरण प्रलंबित पडलेले आहे त्यामुळे आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंब व त्यांची घरे व मूलबाळ उघड्यावर न आणता त्यांना सदरील जमीन वहीतीसाठी देऊन त्यांच्या नावे सातबारा नोंद करावी व शासनाचा जो प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तातडीने रद्द करण्यात यावी व मौजे लोणी व्यंकनाथ येथील इतर शासनाची पडीक जमीन वरती प्रकल्प राबविण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे.
No comments