पिळोदा खुर्दे येथील सरपंच सरला पाटील यांचा जिल्हाधिकारी यांच्याहस्ते सत्कार भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल त...
पिळोदा खुर्दे येथील सरपंच सरला पाटील यांचा जिल्हाधिकारी यांच्याहस्ते सत्कार
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : येथून जवळच असलेल्या पिळोदा खुर्दे गाव क्षयरोग मुक्त झाल्याने येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
२४ मार्च २०२५ रोजी जागतिक क्षयरोग दिना निमित्त जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहु महाराज सभागृहात टिबी मुक्त ग्रामपंचायत पारितोषीक वितरण सभारंभात पिळोदा खुर्दे येथील सरपंच सरला विनोद पाटील व ग्रामसेवक प्रलेश वानखेडे यांना स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पिळोदा खुर्दे गावात यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजू तडवी यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू आहे पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, आशा स्वयंसेविका अनिता पाटील यांनी गावातील लोकांना क्षयरोग मुक्त गाव व गावात वेळोवेळी कार्यक्रम घेऊन सर्वेक्षण केले होते यामुळे गावात एकही क्षयरोगाचे पेशंट नसल्यामुळे गाव क्षयरोग मुक्त झाले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिनभायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयंत मोरे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

No comments