भाजपा जळगांव जिल्ह्याची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भाजपा जळगांव जिल्ह...
भाजपा जळगांव जिल्ह्याची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भाजपा जळगांव जिल्ह्याची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” मंत्री श्री.गिरीषजी महाजन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व मंत्री श्री.संजयजी सावकारे यांच्या उपस्थितीत नुकतिच संपन्न झाली
जळगांव येथे भारतीय जनता पार्टी जळगांव जिल्हाची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक”चे मंत्री श्री.गिरीषजी महाजन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व मंत्री श्री.संजयजी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीत उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रीय सदस्य नोंदणी, नवीन मंडल रचना व बूथ रचना बाबत मार्गदर्शन करून कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी मंत्री श्री.गिरीषजी महाजन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, मंत्री श्री.संजयजी सावकारे यांच्यासह आमदार श्री.अमोल हरिभाऊ जावळे, आमदार श्री. सुरेशजी भोळे, आमदार श्री.मंगेशजी चव्हाण व भाजपा जिल्हा प्रमुख पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
No comments