Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चुंचाळे गावातील ग्रामदैवत मरीमातेच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

चुंचाळे गावातील ग्रामदैवत मरीमातेच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड)...

चुंचाळे गावातील ग्रामदैवत मरीमातेच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चुंचाळे ता.यावल ता.येथे चैत्र शुद्ध प्रतीपदा अर्थात गुढीपाडव्यानिमीत्त रविवारी चुंचाळे गावातील ग्रामदैवत मरीमातेच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला काल ता.29 रोजी सकाळपासूनच गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते प्रथम श्री समर्थ वासुदेव बाबा दरबार,हनुमान मंदिर,मरीमाता मंदिर,महादेव मंदिर,खंडेराव मंदीर,ह्या मंदिरात सायंकाळी सहावाजेला विधीवत पुजा  करण्यात आली व भगत व बगले यांनी दर्शन घेवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली भगत गोकुळ कोळी,बारागाड्या ओढल्या  तर त्यांना बगले पुनम धनगर व संजय साहेबराव पाटील यांनी सहकार्य केले तर वहर म्हणून समाधान राजपुत व कविता समाधान राजपुत होत्या यावेळी बारागाड्या चे पुजनचा मान प्रथम चुंचाळे ग्रा. प. चे माजी सदस्य विठ्ठल राजपूत यांनी केले तर बारागाड्या चा सर्व विधीवज पुजा नायगाव येथील नागमंत्री आमृत पाटील,जगन्नाथ पाटील,भावराव पाटील,सुकदेव धनगर,मंगल पाटील,आंनदा कोळी,अरुण मराठे,एकनाथ महाराज,धनराज पाटील,नारायण महाराज, यांनी केले यावेळी बारागाड्या पाहण्यासाठी  महीलासह सर्व गावातील समाज बांधव एकत्र आला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवचंद कोळी,वि.का.सो.सचालक ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल राजपूत,वाय वाय.पाटील,राष्ट्रवादीचे  विनोद पाटील,धनसिंग राजपूत,रमजान तडवी,सलीम तडवी, शेखर तडवी,नितीन पाटील, यांच्यासह ग्रामस्थ यांनी परीश्रम घेतले यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर याच्या मार्गदर्शनाखाली बागुल पोलीस पाटील गणेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

No comments