adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गलंगी येथे युवा कार्य प्रशिक्षण शिक्षिकेचा निरोप समारंभ संपन्न

  गलंगी येथे युवा कार्य प्रशिक्षण शिक्षिकेचा निरोप समारंभ संपन्न    मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) 26/03/2025...

 गलंगी येथे युवा कार्य प्रशिक्षण शिक्षिकेचा निरोप समारंभ संपन्न 


 मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

26/03/2025, गलंगी जिल्हा परिषद मराठी शाळेत आज भावनिक वातावरणात निरोप समारंभ संपन्न झाला. शाळेतील  शिक्षिका कु नूतन मच्छिंद्र रायसिंग यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्यध्यापिका पूनम पवार ह्या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक,नितीन पवार, रवींद्र नानाभाऊ ठाकरे,सचिन पाटील व पत्रकार मच्छिंद्र रायसिंग आणि गावातले इ. नागरिक उपस्थित होते.


विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि पालक यांनी आपल्या भावना व्यक्त करत कु नूतन मच्छिंद्र रायसिंग यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी कविता, गाणी आणि नृत्य सादर करून आपल्या लाडक्या शिक्षिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


नूतन मच्छिंद्र रायसिंग यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात सर्व सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "शिक्षण क्षेत्रात कार्य करताना मिळालेला विद्यार्थ्यांचा प्रेम आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा हा आयुष्यभर जपण्यासारखा आहे. "कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र ठाकरे व सचिन पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन  शिक्षिका . नूतन रायसिंग यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

No comments