फैजपूरात रमजान ईद निमित्त बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर शहरात गेल्या दरवर्षीप्रमाणे...
फैजपूरात रमजान ईद निमित्त बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरात गेल्या दरवर्षीप्रमाणे रमजान ईद चे मोठे बाजार लागत असते तरी या वर्षी सुद्धा फैजपूर शहराच्या सुभाष चौक पासून बस स्टँड पर्यंत चे बाजार मोठ्या प्रमाणात दुकाने थाटलेली आहे त्यात रेडीमेड पासून बूट चप्पल चष्मे पटे शिवई व शिरखुर्मा चे साहित्य काचे चे भांड्याची दुकाने सुका मेवा सहित मोठ्या प्रमाणात दुकान शहरात लागलेली आहे सुका मेवा यांचे भाव गगनला भिडले असून यावर्षी लोकांमध्ये सुकामेवा खरेदी साठी कमी गर्दी दिसत आहे यावर्षी काजू बादाम चारोली खोपरा मनुका चारोली पिस्ता जास्त भाव असल्यामुळे गोरगरिबांना सुकामेवा खरेदीसाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पवित्र रमजान महिन्याचे रोजे उपवास पासून चांदरात पर्यंत फैजपूर शहरात मोठ्या प्रमाणाने जळगाव भुसावळ यावल रावेर येथील व्यापारी वर्ग आपले व्यवहारासाठी फैजपूर शहरात दाखल झालेले आहे रात्रीचे नमाज नंतर शहरात मोठ्या प्रमाणे लोकांची खरेदी साठी मोठ्या प्रमाणे गर्दी दिसत आहे रेडीमेड कापड बूट चप्पल सॅंडल चष्मे अतर टोपी रुमाल सहित खरेदीसाठी लहान मुलांपासून महिला वर्गांची मोठी गर्दी दिसत आहे यावर्षी सुकामेवा यांचे भाव गगनला भिडले असून व्यापारी वर्ग यांनी सांगितले की दरवर्षी होणारा व्यवहार यावर्षी कमी प्रमाणे लोक सुकामेव्या ची खरेदी करत आहे या चार दिवस चालणारे बाजारामध्ये लाखोंची उलाढाल दरवर्षी होते या बाजारात रावेर यावल तालुक्यातील ५० ते ६० लहान मोठे गावाचे लोक खरेदीसाठी फैजपूर शहरात येत असतात सर्वात फैजपूर ही मोठी बाजारपेठ आहे वाढती महागाई मुळे नागरिकांना धसका बसलेला दिसत आहे अन्य साहित्याचे भावात झालेली वाढ महागाई मुळे नागरिक कामगार व मजूर वर्ग यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.
No comments