चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या आरोपी अटकेत रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) रावेर तालुक...
चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या आरोपी अटकेत
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील आभोडा गावात पतीने पत्नी आशा तायडे हिचा चारित्र्यावर संशय घेऊन गळा आवळून खून केला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. पतीने स्वत: पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मयत आशा तायडे या पती व कुटुंबासह आभोडा गावात शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. पती संतोष तायडे याने पत्नी आशा तायडे हिचा गळा आवळून खून केला. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. विशेष म्हणजे पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वतः रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला. रावेर रावेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे व पुढील तपास सुरू केला आहे
No comments