Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक महिला दिनानिमित्त महिला विकास सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्ती सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

  जागतिक महिला दिनानिमित्त महिला विकास सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्ती सेवा गौरव पुरस्काराने सन...

 जागतिक महिला दिनानिमित्त महिला विकास सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्ती सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१):-जागतिक महिला दिनानिमित्त महिला विकास सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम शहरातील प्रकाशपूर येथे घेण्यात आला.सौ. नूतन सॅम्युअल त्रिभुवन,पास्टर मोजेस नेटके व सौ.वृषाली नेटके,पास्टर अजिंक्य पवार व सौ. मोहिनी पवार यांना ट्रॉफी व शाल देऊन  सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप,माजी नगरसेविका अश्विनीताई सचिन जाधव,माजी नगरसेवक सचिन जाधव,धीरज मुनोत,सौ.नूतन त्रिभुवन पास्टर अजिंक्य व सिस्टर मोहिनी पवार,सौ.नंदा रणदिवे, ऍड.प्रज्ञा उजागरे,प्रीती गरुड,उषा उनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


यावेळी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मनोरमा बुलाखे,दिया साळवी,स्वरूपा साळवी,करुणा बुलाखे, हसीना शेख,सुवर्णा बनसोडे,सिंड्रेला चव्हाण रिबेका चांदणे,शोभाताई पवार, मोनाताई साळवे,ज्योत्स्ना घोरपडे, सुवर्णा बनसोडे श्रीमती जामगावकर ताई,सौ.बबीताताई पाटोळे,सौ.उज्वला बागुल आदी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेविका श्रीमती उज्वला पारधे यांनी केले.

No comments