मनवेल जि.प. प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल ता यावल : येथील ज...
मनवेल जि.प. प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : येथील जि . प. प्राथामिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल पाटील होते
साकळी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा, २६ जानेवरी रोजी घेण्यात आलेल्या साकृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बाक्षिस वाटप करून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला
मुख्यध्यापक संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले व गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या निरोप समारंभ कार्यक्रम विषयी मनातील भावना व्यक्त केल्या यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले
यावेळी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष देविदास कोळी, शिक्षण तज्ञ रविंद्र कोळी, सदस्य पंकज पाटील, पत्रकार गोकुळ कोळी, दगडी शाळेतील मुख्यध्यापक इश्वर तागड ,वर्षा पाटील, ज्योति चौधरी उपस्थित होते प्रास्तविक व सुत्रसंचालन मुख्यध्यापक संगीता पाटील यांनी केले तर आभार प्रविण पाटील यांनी मानले

No comments