adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जि.प.च्या निवडणूका तत्काळ घेण्यासाठी त्रयस्थ अर्ज दाखल करणार जि.प. अन् पंचायत समिती सदस्य असोसिएशनचा निर्णय

  जि.प.च्या निवडणूका तत्काळ घेण्यासाठी त्रयस्थ अर्ज दाखल करणार जि.प. अन् पंचायत समिती सदस्य असोसिएशनचा निर्णय  पत्रकारांशी वार्तालाप करतांना...

 जि.प.च्या निवडणूका तत्काळ घेण्यासाठी त्रयस्थ अर्ज दाखल करणार

जि.प. अन् पंचायत समिती सदस्य असोसिएशनचा निर्णय 

पत्रकारांशी वार्तालाप करतांना जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे व त्यांचे सहकारी

भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

जळगावःजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत तीन वर्षापासून संपलेली असुन न्यायालयात आरक्षणाचा वाद सुरू असल्याने या निवडणूकांना ब्रेक लागला आहे, शासनाकडून सुप्रिम कोर्टात बाजू मांडण्यात आली असली तरी अजून याबाबत तोडगा न निघाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे, निवडणूका तात्काळ व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशनची राज्य संघटना आता न्यायालयासाठी वकील नेमुन त्रयस्थ बाजू मांडणार असल्याचा निर्णय आज असोसिएशनने घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.


जि.प, पंचायत समिती जिल्हा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माजी गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी आज दि.२४ रोजी सानेगुरूजी सभागृहात माजी सदस्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील होते. तर बैठकीला माजी सदस्य नानाभाऊ महाजन, आर. जी. पाटील, मधुकर काटे, माजी जि. पअध्यक्ष दिलीप खोडपे, प्रल्हाद पाटील यांच्यासह माजी सदस्य उपस्थित होते. सुप्रिम कोर्टात आरक्षणाचा वाद सुरू आहे, त्यामुळे तीन वर्षापासून ग्रामिण भागाला न्याय मिळण्यास व अडचणी सोडवण्यास अडचणी येत आहे. ग्रामिण भाग व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा असलेले सदस्यच नसल्याने किमान न्यायालयीन तिढा संपे पर्यंत माजी सदस्यांचा कार्यकाळ वाढवून मिळावा अशी विनंती शासन व न्यायालयाकडे केली जाणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका झाल्यानसल्याने ग्रामिण भागात अडचणींना सामारे जावे लागत आहे. ग्रामिण भागातील अडचणी मांडण्यासाठी लवकरात लवकर निवडणूका होणे आवश्यक आहे अशी भुमिका उपस्थितीतांनी मांडली. यावेळी असोसिएशनने न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी वकील

No comments