जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-ह...
जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन या उपस्थित होत्या तसेच इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्य दिपाली धांडे मॅडम यादेखील उपस्थित होत्या. सौ रंजना महाजन यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्यांना विनम्रअभिवादन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे शिक्षिका श्रीमती संध्या पांडव यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व त्यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य कार्याविषयी माहिती सांगितली जेटी महाजन शाळेच्या दालनात पार पडलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रियंका वेगळे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार सीमरन तडवी यांनी केले याप्रसंगी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments