भुसावळ रेल्वे मंडळ अंतर्गत विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमु...
भुसावळ रेल्वे मंडळ अंतर्गत विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विषयक महत्वपूर्ण विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य रेल्वे, भुसावळ विभाग व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्यासह आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध एक्सप्रेस व मेमू साठी रेल्वे थांब्यांना मंजुरी, रेल्वे पुल (ROB-RUB) काम पूर्ण करणे, एमएसआरटीसी-रेल्वे जमीन देवाणघेवाण, दुसखेडा एलएचएस रस्ता दुरुस्त, झाडे काढणे, भादली आणि बोदवड, आरयूबी व सावदा येथे लाईटिंग कार्यान्वित करणे, मलकापूर आणि वडोदा दरम्यान एलसी/१३, मोठी दुरुस्ती पूर्ण झाली आहे, पहूर येथे गुड्स शेड मंजूर करणे, नांदुरा यार्ड एलसी/१९ येथे सबवे मंजूर, नांदुरा एलसी/२० येथे आरओबी अलाइनमेंट अंतिम करणे, भुसावळ ते जेएनपीटी पर्यंत कंटेनर रेक वाहतुकीची शक्यता यावर चर्चा करण्यात आली. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध प्रवासी संघटना, व्यापारी संघटना यांच्याकडून आलेल्या विविध रेल्वे संबंधी मागण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच रेल्वेच्या इतर कामांचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आढावा घेऊन, सदर कामे तत्काळ मार्गी लावणे संबधी रेल्वे अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तसेच आपल्या स्तरावरून रेल्वे मंत्रालयास कोणकोणत्या बाबींचा पाठपुरावा करावा याबाबत विचारणा केली.

No comments