गांजा खरेदीविक्रीसाठी आलेल्या तीन इसमांचा चोपडा शहर पोलीसांकडुन मुद्देमालासह अटक चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहरा...
गांजा खरेदीविक्रीसाठी आलेल्या तीन इसमांचा चोपडा शहर पोलीसांकडुन मुद्देमालासह अटक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात नगर पालीकाचे मागील भागत दोन इसम त्यांच्याकडील मोटारसायकलवर गांजा विक्रीसाठी येणार असल्याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गोपनीय बातमी मिळाली होती.
त्याअनुषंगाने सदर बातमीबाबत वरिष्ठांना तात्काळ माहिती देवून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन एन डी पी एस कायद्यामधील तरतुदींनुसार आवश्यक खबरदारी बातमीतील ठिकाणी सापळा लावुन गांजा विक्रीसाठी आलेले इसम नामे सविन सायसिंग वर्ड,वय २३ वर्षे,रा.निशाण्यापाणी,ता वरला,जि बडवाणी म.प्र.,अनिल झान्या बारेला,वय २५ वर्षे,रा.आमल्यापाणी,ता.वरला,जि बडवाणी,ह.मु.उसमोडी,नवाड,ता.यावल,जि जळगाव यांना तसेच सदर गांजा घेण्यासाठी आलेला संशयीत इसम,रुमशा पिदा बारेला,वय ४० वर्षे,रा पांजऱ्या,धवली,ता.वरला,जि बडवाणी म.प्र.अशा तिघांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले असुन त्यांच्या ताब्यातुन एका पांढऱ्या गोणीमध्ये पॅक असलेला ११ किलो ७५९ ग्रॅम वजनाचा गांजा,दोन मोटारसायकल्स,तीन मोबाईल फोन असा एकुण २,४२,६००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनास्थळी चोपडा उपविभागाची फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करुन अंमली पदार्थ गांजाच्या जप्तीकामी फॉरेन्सिक व्हॅनवरील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.मिळुन आलेल्या संशयीतांविरुध्द चोपडा शहर पो.स्टे.गुरनं.२०७/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (C) सह २० (b) (ii) (B),२२ (B) प्रमाणे नोंद करण्यात आला असुन मिळुन आलेल्या तीनही आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करून न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता त्यांना दिनांक ०२/०४/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, जळगाव महेश्वर रेड्डी,तसेच अपर पोलीस अधिक्षक,चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी,चोपडा उपविभाग अण्णासाहेब घोलप यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे,सहा.पोनि.एकनाथ भिसे,पो.हे.कॉ संतोष पारधी,पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे,पोना संदिप भोई,पोकों निलेश वाघ,पोकों विनोद पाटील यांनी पार पाडली.



No comments