वनवा लावणारे वन विभागाच्या रडावर. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खा-यापाडा येथे वनसंपदेचा नाश करणाऱ्या आरोपीस अटक करून न्या...
वनवा लावणारे वन विभागाच्या रडावर.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खा-यापाडा येथे वनसंपदेचा नाश करणाऱ्या आरोपीस अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी. वैजापूर दिनांक 14 मार्च रोजी राखी वनातील नियत क्षेत्र खाऱ्या पाडा पश्चिम मधील कक्ष क्रमांक 243 व 244 यात वनवा पेटवणाऱ्या धामण्य मध्य प्रदेश येथील आरोपीस घटनास्थळी रंगेहात पकडण्यात आले असून वनवा मुळे 15 हेक्टर क्षेत्रावरील जैवविविधता नष्ट झाली असून पाला व पाचोळा पूर्णतः जळून नष्ट झाला आहे.सदर आरोपीस पकडून भारतीय वन अधिनियम 1927 चा,जैवविविधता अधिनियम 2002, तसेच वन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत वन अपराध नोंदवून, न्यायालयात हजर करण्यात आले. सदर आरोपीस दिनांक 27 मार्च पर्यंत वन कुठली मिळाली.सदरची कार्यवाही मुख्य वनसंरक्षक धुळे, सोमराज मॅडम,उपवनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख,विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे वनवृत्त श्री सदगीर,सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे साहेब,सहायक वनसंरक्षक यावल समाधान पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र वैजापूर विकेश ठाकरे,अतिरिक्त वनपाल चुनीलाल कोळी,वनरक्षक संदीप ठाकरे,वंदना बारेला,नेहा बारेला,बाजीराव बारेला,जुबेर तडवी,वनसेवक रोहन पावरा,पुनमचंद पावरा,शांताराम पावरा,सुभाष पावरा,दशरथ कोळी,आदींनी केली.
ग्रामस्थांना आव्हान
राखीव वनात गौण वन उपज संकलन करताना कोणीही वनवा वनवा लावण्याचा प्रयत्न केला अथवा राखीव होणार फिरताना ज्यांच्याकडे माचिस किंवा अग्निजन्य पदार्थ आढळून आल्यास अशा माणसांवर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 तसेच भारतीय वन अधिनियम 1927 जैवविविधता अधिनियम 2000 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.व वरिष्ठांच्या आदेशान्वये गौण वणूपच संकलन बंद करण्यात येईल याबाबत जाहीर आवाहन विकेश ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर,के.वाय.शेख वन परिमंडळ अधिकारी , खाऱ्यापाडाव यांनी केले आहे.

No comments