adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. टी.महाजन इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये ट्रॅडिशनल डे मधून भारतीय संस्कृतीचे दर्शन

  जे. टी.महाजन इंजिनीअरिंग कॉलेज  मध्ये ट्रॅडिशनल डे मधून भारतीय संस्कृतीचे दर्शन  इदू पिंजारी फैजपूर-  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर ...

 जे. टी.महाजन इंजिनीअरिंग कॉलेज  मध्ये ट्रॅडिशनल डे मधून भारतीय संस्कृतीचे दर्शन 


इदू पिंजारी फैजपूर- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील जे. टी.महाजन इंजिनीअरिंग कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन - उत्सव 2025 च्या निमित्ताने  ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशातील विविध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी या डे मधून घडवले. बंगाली, घागरा, शेरवानी, नऊवारी साडी, कोळी वेशभूषा, पंजाबी यांसारख्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी हा ट्रॅडिशनल डे साजरा केला. यानिमित्त रंगीबेरंगी पोशाख परिधान करून विद्यार्थी फोटो आणि सेल्फी काढताना कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसले.

                 त्यासोबत वार्षिक स्नेहसंमेलन म्हटले की सर्वात आवडता कार्यक्रम असतो तो म्हणजे शेलापागोटे चा (Fishpond). यामध्ये विदयार्थी आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा शिक्षक सर्वांनाच पण काही  उपहासात्मक असे टोमणे किंवा जोक्स,चारोळ्या, शायरी त्यांच्याबद्दल लिहून त्यांच्याबद्दल आदर व प्रेम व्यक्त करत असतो. यात विद्यार्थ्यानी खूपच आनंद लुटला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  प्राचार्य डॉ.के.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा.एम.डी.पाटील, प्रा.सुषमा बेंडाळे, प्रा.स्वप्नाली वाघुळदे, प्रा. रूपाली भारंबे, प्रा.व्ही.व्हि. महाजन प्रयत्न करीत आहे.

No comments