रावेर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या ६ गायींसह ९ वासरे पकडले गुन्हा दाखल करीत वाहन केले जप्त रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेम...
रावेर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या ६ गायींसह ९ वासरे पकडले गुन्हा दाखल करीत वाहन केले जप्त
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेल्या ६ गायी व ९ वासरांना वाचवले असून कार चालक व मालकावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमध्ये (एमएच ०४, एफयू ६२१७) रायसिंग उर्फ भाई रामसिंग अजनारे आणि चालक आकाश बारेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ते मध्य प्रदेशातील गायी अहिरवाडीमार्गे महाराष्ट्रात कत्तलीसाठी गोवंश मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अहिरवाडी तालुका रावेर या मार्गाने आणणार आहेत. अशी गोपनीय माहिती रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जैस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील यांना मिळाली, त्यानुसार रावेर पोलीस कर्मचाऱ्यांनी अहिरवाडी गाठले. रावेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह पाळत ठेवून रात्री अडीच वाजता अहिरवाडीजवळ हे वाहन पकडले. या वाहनात ६ गायी आणि ९ वासरे होती. दरम्यान, कार चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदणी केली आहे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाटील तपास करत आहेत. या गुरांची सुटका करून त्यांना खानापूरच्या चोरवड नाक्याजवळील गोशाळा मध्ये गायी व गोवंश पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी वाहन जप्त करून कायदेशीर कारवाई केली
No comments