चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न.. (शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्...
चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न..
(शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्फे यशस्वी आयोजन)
![]() |
चोपडा मल्हारपुरा येथे कानुदेवी व कन्हेर देवाच्या लग्नउत्सव प्रसंगी उपस्थित जगन्नाथ बाविस्कर, चंद्रभान कोळी, मनोज वाघ व सहकारी भाविकभक्त मंडळ.. |
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा (दि१९):- शहरातील मल्हारपुरा येथील रहिवासी बाविस्कर कोळी परिवारातर्फे संकल्पित श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवांचा शुभलग्न सोहळा शेकडों भाविकभक्त व नगरवासीयांच्या उपस्थितीत विधिवत व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. खान्देशात कानुबाईचा पारंपारिक लग्नउत्सव सोहळा साजरा केला जातो. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह पुरणपोळीचा नैवेद्य व महाप्रसाद केला जातो. कानबाईला पार्वती देवीचा तर कन्हेरदेवाला भगवान शिवाचा अवतार मानला जातो. हा लग्नसोहळा चैत्र पौर्णिमेनिमित्त तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी रासपूजन, गहू दळणे, रत्ने आणणे, सवाद्य माता मिरवणूक, मोगरा थाट तर दुसऱ्या दिवशी पाणी आणणे, मांडव व कन्हेर आणणे, हळद लावणे, भोजन, गोरख फेरी, कानबाईचे लग्न, नारळ परनणे, महाप्रसाद भोजन भंडारा व रात्री देवीच्या भगतांची महाबैठक असते. तिसऱ्या दिवशी कानबाई मातेचे विसर्जन होऊन कार्यक्रम संपन्न होत असतो. याठिकाणी कानुदेवी सोबत कन्हेरदेवाची मुर्ती हुबेहूब व मनमोहक दिसत असल्याने उपस्थितांचे जणु डोळ्यांचे पारणे फिटल्या सारखे वाटत होते. सर्वांनी कानुदेवी व कन्हेर देवाचा जयघोष करून पुरणपोळी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यासाठी शिव मल्हार गोरक्षनाथ आदेश देवऋषी संघटना मांडळचे अध्यक्ष मनोज वाघ (शिंदखेडा), तालुका अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.), मुख्य भगत चंद्रभान कोळी (बोहरा) त्यांचे सहकारी कुणाल भगत, सागर भगत, शांताराम कोळी, योगेश धनगर, गोलु भगत, राजु धनगर, सुभाष धनगर, विजय कोळी, बापु कोळी, जितेंद्र भिल, हिलाल धनगर, राजेन्द्र कोळी, सुनील भगत यांचेसह भिका बाविस्कर, गोविंदा बाविस्कर, नारायण बाविस्कर, गंगाराम बाविस्कर, विजय बाविस्कर,विशालराज बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. याप्रसंगी भाविकभक्त, माताभगिनी, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी जयेश बाविस्कर व मल्हारपुरा मित्रमंडळाने सर्वांचे जाहीर आभार मानले.

No comments