साकळी गावपरंपरेच्या शिवजयंतीला सर्वपक्षीय राजकीय मंडळी एकत्र ! दि.२९ एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव वैचारिक मतभेद बाजूला ठेवत गावासाठी एकत्...
साकळी गावपरंपरेच्या शिवजयंतीला सर्वपक्षीय राजकीय मंडळी एकत्र !
दि.२९ एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव
वैचारिक मतभेद बाजूला ठेवत गावासाठी एकत्र
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता.यावल :- साकळी येथील गाव परंपरेच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवानिमित्त गावातील सर्व राजकीय मंडळी आपले आपापसातील वैचारिक मतभेद बाजूला ठेवून अगदी तन-मन- धनाने एकत्र आल्याचे दिसून येत आहे. या जयंती उत्सव समितीमध्ये गावातील सर्व मातब्बर युवा राजकारणींचा समावेश आहे.एकूणच या राजकीय मंडळींच्या एकत्रीकरणामुळे या उत्सवात एक वेगळे स्वरूप पाहिला मिळत आहे.आणि यातून एक वेगळा एकतेचा संदेश सर्वत्र जाणार आहे.
येथे फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात असते.यंदाच्या वर्षी म्हणजे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी दि.२९ एप्रिल २०२५ रोजी गावातील सर्व शिवभक्तांच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.गेल्या अनेक दिवसापासून गावातील शिवभक्त युवा वर्ग तयारीला लागलेला आहे.या उत्सवासाठी ग्राम स्तरावर एक उत्सव समिती गठीत करण्यात आली असून या समितीत अध्यक्षस्थानी भाजपाचे पूर्व विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष तथा जि.प.माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र (छोटू) सूर्यभान पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.रवींद्र पाटील यांचे वडील मा.जि.प.सदस्य स्व.सूर्यभान अण्णा पाटील हे भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते होते. सुद्धा त्याचप्रमाणे समितीमध्ये उपाध्यक्षपदी शारदा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक शामकांत वसंतराव महाजन हे आहेत.शामकांत महाजन हे मा.जि.प.सदस्य तथा राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व.वसंतराव महाजन व मा.जि.प.सदस्या श्रीमती विद्याताई महाजन यांचे चिरंजीव आहे.एकूणच वडिलांपर्यंत हे घर काँग्रेसची विचारसरणीचे होते.त्याचप्रमाणे समितीमध्ये सचिव म्हणून निवड झालेले गावाचे लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे.खजिनदार म्हणून भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुनील लक्ष्मण पाटील हे पदभार सांभाळणार आहे.त्याचप्रमाणे समिती सदस्य म्हणून ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण खेवलकर हे असून ते शिवसेना (शिंदे गट) या पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आहेत.याचप्रमाणे या समितीत सदस्य म्हणून पदभार सांभाळत असलेले दुसरे ग्रामपंचायत सदस्य मुकेश बोरसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल तालुका अध्यक्ष आहेत. तसेच या समितीत काही आजी-माजी पदाधिकारी- राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते सुद्धा आहे.त्याप्रमाणे या उत्सवामध्ये यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भाजपाचे कार्यकर्ते विलास नाना पाटील हे मिरवणुकीत जेसीबी द्वारे एक क्विंटल फुलांचा वर्षाव करणार आहे.त्यात प्रमाणे यावल पंचायत समितीचे माजी प्र.सभापती तथा भाजपा कार्यकर्ते हे सुद्धा उत्सवासाठी मोठा हातभार लावीत आहे.अशाप्रमाणे जयंती उत्सव समिती सर्वांनुमते निवड झालेली आहे.एकूणच या समितीमधील सर्व पदाधिकारी युवा वर्गातील असून त्या सर्वच स्थानिक राजकीय मंडळींचा आपापल्या पक्षात चांगले वजन व दबदबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव निमित्ताने महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत व आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्व मंडळी एकत्र आल्याने गावासाठी एक खूप मोठा आदर्श निर्माण झालेला आहे.यामुळे सर्वांच्या मदतीने हा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडेल यात कुठलीही शंका नाही व यानिमित्ताने गावात एकतेचे वातावरण दिसून येत आहे व हा संदेश सर्वत्र जाईल हे निश्चित आहे.
No comments