यावल येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -...
यावल येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रा दिंडोरी प्रणित यावल येथे शनीवारी श्री स्वामी समर्थ पुण्यातिथी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळ पासुन या कार्यक्रमात मोठ्या संख्येत भाविक,भक्तांचा सहभाग होता. तर दुपारी येथे गोपाळ काला पार पडल्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले.शहरातील भुसावळ रस्त्यावर दुरसंचार विभाग कार्यालय जवळ श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. या केंद्रात शनीवारी श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात अखंड नाम जप यज्ञ, श्री गुरुचरित्र पारायण, सात दिवस स्वामी चरित्र ग्रंथ वाचन , माळ जप,वीणा वादक, असे सात दिवस अखंड या सप्ताहात करण्यात आली तसेच
श्री गणेश याग, श्री स्वामी याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री मल्हारी व रूद्र याग सह अखंड स्वामीचरीत्र वाचन वीणा वादन आणि अखंड श्री स्वामी समर्थ मंत्र जप कार्यक्रम पार पडले यात मोठ्या संख्येत भाविक,भक्तांची उपस्थिती हाेती. तर या कार्यक्रमात आलेल्या भाविकांना विविध विषयांवर अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले. तर दुपारी गोपाळकाला यश ठिकाणी पार पडला व त्यानंतर उपस्थित भाविक,भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता केंद्रातिल पदाधिकारी व सेवेकर यांनी परिश्रम घेतले.
No comments