मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षिस वितरण आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रदान भरत को...
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षिस वितरण आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रदान
भरत कोळी यावल ता प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : सन २०२४- २५
या शैक्षणिक वर्षांमध्ये मा.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत प्रतियोगितेचे शासनातर्फे आयोजन करण्यात आले होते यात तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता यामध्ये मा. मुख्यमंत्री शाळा माझी शाळा सुंदर अंतर्गत शारदा विद्या मंदिर साकळी या विद्यालयाचा प्रथम क्रमांक आलेला आहे.
या स्पर्धेचे दि.२८ एप्रिल रोजी सोमवारी यावल प.स. सभागृहात बक्षिस वितरण करण्यातआले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा मतदारसंघाचे आ.प्रा चंद्रकांत सोनवणे होते तर व्यासपीठावर यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड , गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, शापोआ अधीक्षक मगर साहेब, संस्थेचे माननीय अध्यक्षा ,उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व सर्व संचालक मंडळ,तसेच तालुक्यातून द्वितीय व तृतीय क्रमांकाने आलेल्या शाळांचे संस्थाचालक , तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम तीन क्रमांकाने आलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, तथा शिक्षक- शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यालयाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. यात विद्यालयाला तीन लाख रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र, व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.विद्यालयाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवण्यात संस्थेच्या अधयक्षा विद्याताई वसंतराव महाजन, उपाध्यक्ष सुभाषराव महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे, संचालक शामकांत महाजन, व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन, पर्यवेक्षक एस जे पवार, यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एन पी पाटील यांनी मानले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments