वढोदा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :- येथून जवळच असलेल्या वढोदा ये...
वढोदा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- येथून जवळच असलेल्या वढोदा येथील ग्राम पंचापत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावल तालुका कॉग्रेस कमेटीचे तालुकाधक्ष तथा माजी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सरपंच गोपाल चौधरी, ग्राम पंचायत सदस्य किरण सोनवणे, पोलिस पाटील चेतन सोनवणे, आशा सेविका सविता सोनवणे, ग्रामसेवक, गावकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

No comments