साकळी ता.यावल येथील माळी समाजाने मानले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार, डॉ. सुनिल पाटील यांची संकल्पना... भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक...
साकळी ता.यावल येथील माळी समाजाने मानले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार, डॉ. सुनिल पाटील यांची संकल्पना...
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुकतेच दिनांक 24 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यसरकारने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महामानवाना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात "भारतरत्न " मिळावा असा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर केला. व तो ठराव केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. त्यानिमित्ताने साकळी येथील श्री संत सावता महाराज बहू-उद्देशीय संस्था, महाराष्ट्र माळी महासंघ, शाखा साकळी तसेच भूमि फाउंडेशन, साकळी यांनी आज साकळी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198 व्या जयंतीचे औचित्य साधून या पवित्र दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "धन्यवाद देवेंद्रजी "असे पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व अभिनंदन केले. या मोहिमेत शेकडो सर्वजातीय, सर्वधर्मीय नागरिक यांनी सहभाग घेतला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना "धन्यवाद देवेंद्रजी" असे पत्र लिहीले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व समाजबांधवानी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण अर्पण करून व विधिवत श्रीफळ फोडून ढोल ताशांच्या गजरात जय ज्योती जय क्रांतीचा जयघोष करीत मानवंदना करण्यात आली.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महा मानवाचें सामाजिक सुधारणा व समता, शिक्षण विशेषतः मुलींचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, औद्योगिक व व्यापार क्षेत्र, प्लेग साथीच्या वेळी वैद्यकीय कार्य यांसारख्या सर्वच क्षेत्रात महान कार्य असल्यामुळे त्यांना 1888 यावर्षीच जनतेने "महात्मा " ही पदवी बहाल केली होती. ती पदवी म्हणजे "जनमान्यता" व "लोकमान्यता " होती.
आता महाराष्ट्र सरकारने जनभावनेचा आदर, विविध स्तरावरून वारंवार होणारी मागणी अनुषंगाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंदजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा असा ठराव विधानसभेत मंजूर केला, व पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला. त्यामुळे भारतरत्न या पदवीमुळे "राजमान्यता" मिळेलच. भारतरत्न पेक्षा महात्मा ही पदवी मोठी असली तरी लोकमान्यता सोबत आता राजमान्यता असेल म्हणून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानत आहोत, असे भूमी फाउंडेशनचे डॉ. सुनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार महापुरुषांच्या प्रति नेहमीच आदरभावना ठेवत असून आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठया योजनेला महात्मा फुले जनाआरोग्य योजना असे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ही योजना चालू आहे. महाज्योती च्या माध्यमातून ओबीसी युवक व विद्यार्थ्यांना खुप आधार मिळत असतो. या योजना म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचारांचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव, श्री संत सावता महाराज बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र माळी महासंघ शाखा साकळी यांच्या सर्व समाजबांधवानी परिश्रम घेतले.व धन्यवाद देवेंद्रजी या अभियानच्या संकल्पना व संकलन बद्द्दल डॉ. सुनिल पाटील यांचे आभार सर्व समाजबांधव यांनी व्यक्त केले.

No comments