जे.ई.स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड सुरूच... मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
जे.ई.स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड सुरूच...
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व होमी भाभा फॉउंडेशन मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त चि. समर्थ शिवाजीराव वंजारी. याची ISRO ला भेट देण्यासाठी झालेली निवड तथा चि.श्लोक निलेश महाजन आणि कु.समृद्धी कपिल जंगले यांनी मिळवलेले यश ही आपल्यासाठी खूप खूप अभिमानास्पद बाब आहे.
चि.समर्थ मुबंईहून उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार स्विकारल्या वर विमानाने 21 तारखेला इस्रो (ISRO) श्रीहरीकोटा येथे रवाना होणार आहे.
तिघांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...असेच यश मिळवून आपल्या शाळेचे आणि परिवाराचे नाव मोठे करा हीच सदिच्छा संस्थेच्या अध्यक्ष आदरणी रोहिणी ताई खडसे उपाध्यक्ष श्री नारायणदादा चौधरी,सचिव डॉ श्री सी एस चौधरी तथा सर्व संचालक मंडळ यांनी व्यक्त करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आदरणीय मुख्याध्यापक श्री एन पी भोंबे सर, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनीनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुक्ताईनगर परिसरातील सर्वच स्तरातून विद्यार्थी तथा पालकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
No comments