रावेर परिसरात गारपीट व पाऊस शेतकऱी चिंतातुर रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज 12 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्य...
रावेर परिसरात गारपीट व पाऊस शेतकऱी चिंतातुर
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज 12 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन रावेर शहर व जवळील रावेर शहर खिरवड विटा निंबोळसह काही गावात दुपारी पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच गारपीटही झाली. व केळीच्या बागा व पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आगाऊ नुकसान भरपाई, पीक विमा कर्जमाफी आदींच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत, याशिवाय 12 एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. रावेर तालुक्यात आज दुपारी चार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रावेर शहरासह परिसरातील काही गावात काही मिनिटे गारपीट झाली.
या वादळामुळे केळी बागांची पाने तुटली असून काही भागांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासन आणि पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमान ४५ अंशांवर पोहोचले होते. आज सकाळपासूनच उन्हात ढगाळ वातावरण झाल्याने वातावरणात काहीसा बदल झाला आहे. दुपारी शहर व परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीची तीन-चार मिनिटे शहरात गारपीट झाली. 4 वाजता सुरू झालेला पाऊस अजांडा, निंबोळ, कुसुंबा विटावापर्यंत सुरू होता.
उटखेडा, भोर, भातखेडा,पुनखेडा, पातोंडी परिसरात गारपीट झाली आहे. वादळामुळे रावेर सावदा रस्त्यावर कडुलिंबाचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वादळामुळे केळी बागांची पाने तुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे केळी बागांचे नुकसान झाले आहे.

No comments