शहरी आरोग्य वर्धीनी केन्द्र तथा आयुष्य आरोग्य मंदीर केद्रांचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हस्ते शुभारंभ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
शहरी आरोग्य वर्धीनी केन्द्र तथा आयुष्य आरोग्य मंदीर केद्रांचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हस्ते शुभारंभ
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरामधील आशा टाकी परिसरातील पटवे गल्ली व के जी एन कॉलनी या दोन ठिकाणी १५ वा वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्य वर्धीनी केन्द्र तथा आयुष्मान आरोग्य मंदिर या आरोग्य केंद्रांचा शुभारंभ आज चोपडा तालुक्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
शहरी भागातील सर्वसाधारण नागरिकांसाठी घराजवळच मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सदर आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
सदर आरोग्य केंद्रामध्ये बाह्य रुग्ण सेवा,मोफत औषधोपचार,मोफत चाचण्या,गर्भवती मातांची तपासणी,लहान मुलांचे लसीकरण, ई सेवा घराजवळच उपलब्ध होणार असून सदर सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा व आपले आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन माननीय आमदार महोदय यांनी केले.सदर प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर,नगर परिषद मुख्याधिकारी राहुल पाटील,कृउबा सभापती नरेद्र पाटील,संचालक शिवराज पाटील,विजय पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,सागर ओतारी,कैलास बाविस्कर,महेमुद बागवान,महेंद्र धनगर,दिपक चौधरी,प्रदीप बारी,निजाम कुरेशी मोईन कुरेशी,गणेश पाटील,बडगुजर नाना,काल्या दादा,नंदु गवळी,हाजी साहब,देशमुखभाऊ,देवाभाऊ,राहुल पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ शिल्पा बोरसे,डॉ प्रशांत पाटील,डॉ विवेक जैस्वाल,आरोग्य सहाय्यक जगदीश बाविस्कर,आरोग्य विभागाचे राजु पाटील,दिलावर वळवी,नदीम शेख,रामलू मडावी,गजानन करंदीकर,दिनेश बारेला,प्रभाकर जोशी,आरोग्य सेविका सुचिता पांडे,दिपाली सोनवणे,सविता नाथबुवा,आशा सेविका,पदाधिकारी,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments