adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासूर येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीआई फुले यांचे भव्य स्मारक

  लासूर येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीआई फुले यांचे भव्य स्मारक   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 11.04.2025 श...

 लासूर येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीआई फुले यांचे भव्य स्मारक  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक 11.04.2025 शुक्रवारी  तात्या साहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने माळी समाज विकास मंडळ लासूर व सावता महाराज युवक संघ शाखा लासूर यांच्या मार्फत माळी समाज मंगल कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. तसेच, गावातील सर्व पक्षांचे, सर्व जाती धर्माचे बंधू हजर होते. त्यानंतर बाजार चौकात तात्या साहेब महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री आई फुले यांचे स्मारक भव्य स्वरूपात उभारले जाणार आहे. त्याचे भूमी पूजन सुद्धा आज करण्यात आले.


       त्या निमित्ताने स्मारक साठी जी फ्रेम लावली जाणार आहे. त्या फ्रेम ची किंमत २४०००/- रू. ची रक्कम संत सावता महाराज पत पेढीचे संचालक व लासूर येथील ज्युनिअर कॉलेज चे प्राध्यापक श्री. एच. एच. माळी सर (जिभा ऊ) यांनी स्वतः सांगितले की, मी फ्रेम चे पैसे देणार आहे. त्यांनी स्वतः दानशूर पणा दाखून समाज प्रेम सिद्ध केले आहे. त्याबद्दल त्यांचे समाज तर्फे हार्दिक अभिनंदन व आभार सुद्धा. 


No comments