आगामी सण-उत्सवात जातीय सलोखा अबाधित राखा -सपोनि विशाल पाटील रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) एप्रिल महिन्यात साजर...
आगामी सण-उत्सवात जातीय सलोखा अबाधित राखा -सपोनि विशाल पाटील
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
एप्रिल महिन्यात साजरी होणाऱ्या सर्व महापुरुषांच्या जयंत्या व सण उत्सव हे सर्व धर्मांना सामावून घेत शांतता, सद्भावना आणि एकात्मतेने साजरे केले जावेत जेणेकरून जातीय सलोखा, एकता आणि बंधुता टिकून राहता येईल. असे आवाहन सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय विशाल पाटील यांनी सावदा पोलीस स्टेशन परिसरातील नागरिकांना केले आहे. यासोबतच सावदा पोलिस स्टेशन सावदा शहर व सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातील नागरिक, सोशल मीडिया सिस्टीमचे मोबाईल वापरकर्ते, कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावणारे सोशल मीडिया (फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटरवर फोटो टाकू नका) मोबाईल वापरणाऱ्यांना आवाहन केले आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सामाजिक सलोखा राखण्यास मदत करा.
कोणी अफवा पसरवून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर याबाबत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. कोणत्याही समाजविघातक कार्यात सहभागी होऊ नका. अशा कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. असे आवाहन सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे.

No comments