यावल येथील साने गुरुजी विद्यालयातील माजी विद्यार्थी देवेंद्र काटकर एम बी बी एस प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (सं...
यावल येथील साने गुरुजी विद्यालयातील माजी विद्यार्थी देवेंद्र काटकर एम बी बी एस प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील धनगर वाडा येथील रहिवासी तथा साने गुरुजी विद्यालयातील माजी विद्यार्थी डॉक्टर देवेंद्र विलास काटकर(धनगर) हा मुंबई येथील ग्रेट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सर जेजे हॉस्पिटल येथून एमबीबीएस प्रथम श्रेणीतून नुकतेच उत्तीर्ण झाले त्यांचा पदवी ग्रहण सोहळा मुंबई येथे दिनांक 25 मार्च रोजी श्री पुष्पकानंद सरस्वती हॉल सायन मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला डॉक्टर देवेंद्र काटकर हा यावल येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक व्ही ए काटकर यांचा मुलगा आहे त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे त्यांच्या निवडीबद्दल साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक एम के पाटील पर्यवेक्षक विजय नन्नवरे व सर्व कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले

No comments