फैजपुरात आ.एकनाथ खडसे यांच्या बेताल वक्तव्याचा भाजप तर्फे निषेध; प्रांताधिकारी यांना निवेदन सादर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ...
फैजपुरात आ.एकनाथ खडसे यांच्या बेताल वक्तव्याचा भाजप तर्फे निषेध; प्रांताधिकारी यांना निवेदन सादर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरण्याचा निषेधार्थ फैजपुरात भाजपच्या वतीने घोषणाबाजी करत प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले..
निवेदनात म्हटले आहे की आमदार खडसे यांनी केलेल्या वक्तव्य खालच्या स्तराचे असून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा बलीन करण्याचा प्रयत्न केला आहे ही कृती अत्यंत निंदनीय आहे त्यांनी त्वरित जाहीर माफी मागावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन खेडेल असा इशारा देण्यात आला आहे आमदार खडसे यांची भाषा ही राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडली आहे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे सार्वजनिक जीवनात अश्लील भाषा आणि खालच्या पातळीवरील टीका यांना थारा देण्यात येणार नाही असे ठाम मत भाजपने व्यक्त केले यावेळी भाजपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपाचे माजी नगराध्यक्ष निलेश (पिंटू) राणे, माजी नगरसेवक राकेश जैन, सामाजिक कार्यकर्ते गोटू भारंबे ,रामा होले ,वैभव वकारे, पराग पाटील ,अक्षयसिंह परदेशी,मनोज चौधरी ,गोलू चौधरी ,हेमराज चौधरी ,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments