मोठे वाघोद्यात भिम उत्सव साजरा मोठे वाघोदा प्रतिनिधि मोहसीन मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे ...
मोठे वाघोद्यात भिम उत्सव साजरा
मोठे वाघोदा प्रतिनिधि मोहसीन मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे आज भिम जयंती मोठ्या उस्ताहात व आनंदात साजरी करण्यात आली.ठिकठिकाणी प्रतिमा पुजन तर गावातुन बैन्ड वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली
या मिरवणुकीत रमाई नगर मधील भीमसैनिकांनी बनवलेली भिमा रमाईची कुटीया सर्वाचे लक्ष वेधुन होती.तसेच सर्वच मंडळानी वेगवेगळे देखावे बनवुन लक्ष वेधले तरुण भारतीय मित्र मंडळ लहान वाडा यांचाही एक 1 रु चलनाचा देखावा व संघर्ष मित्र मंडलाचा दिव्यांची आरास असलेला गोल्डण देखावा आकर्षित होता तसेच सजवलेल्या रथात गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.ठिकठिकाणी या महापुरुषाचे पुजन व स्वागत करण्यात आले गावातील भीम जयंती उस्तव समीतीच्या आयोजकांकडुन सर्व भीमसैनिक व गावातील बांधवासाठी जेवनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले होते बसस्टेण्ड परीसरातही डा बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे सामुहीक पुजन करण्यात आले.उपस्थितांनी बाबांसाहेबांचा जिवन परिचय तसेच आपले मनोगत व्यक्त केले
त्यावेळी गावातील मृत्यु झालेले CISF चे जवान यांना श्रद्धांजली वहाण्यात आली तसेच मिरवणुकीत देशभक्ती गीत सादर करुन यांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक सरपंच उपसरपंच ग्रा प सदस्य पोलीस पाटील व सर्व समाजाचे समाज बांधव उपस्थित होते.सर्व परिसर निळेमय झाला होता. गावातुन मुख्य मार्गावरुन मिरवणुक काढण्यात आली बैण्ड पथकाच्या तालावर तरुणाई थिरकली
मिरवणुकीत संघर्ष मित्र मंडळ मोठा वाडा आंबेडकर नगर निंभोरा रोड रमाई नगर मित्र मंडळ तरुण भारतीय मित्र मंडळ लहान वाडा व संपूर्ण बौद्धजनसंघ सहभागी झाला होता.मिरवणुक यशस्वीते साठी गावातील जेष्ठ भिमसैनिकांनी सहकार्य केले तसेच सावदा पो स्टे चे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पीएसआय बशिर तडवी पोहेकॉ विनोद पाटील पोहेकॉ रमजान तडवी पोहेकॉ चौधरी आदींनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.


No comments