adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर येथे भिमरायांना अभिवादन डॉ बाबासाहेबांना प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार बंडू कापसे आमदार अमोल जावळे नायब तहसीलदार संजय तायडेंसह मान्यवरांची मानवंदना

  रावेर येथे भिमरायांना अभिवादन डॉ बाबासाहेबांना प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार बंडू कापसे आमदार अमोल जावळे नायब तहसीलदार संजय तायडेंसह...

 रावेर येथे भिमरायांना अभिवादन

डॉ बाबासाहेबांना प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार बंडू कापसे आमदार अमोल जावळे नायब तहसीलदार संजय तायडेंसह मान्यवरांची मानवंदना 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .


येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात उत्सव समितीचे अध्यक्ष संघरक्षक तायडे यांचे नेतृत्वाखाली त्रिशरण, पंचशील घेण्यात आले . आमदार अमोल जावळे, प्रांत अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बी ए कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे सह उपस्थितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आमदार जावळे यांनी बाईक रॅलिस झेंडी दाखवून सुरुवात केली. डॉ. संदीप पाटील, डॉ. सुरेश पाटील, हरिष गणवानी, दारा मोहम्मद, डॉ. राजेंद्र पाटील सी. एस. पाटील, अरुण शिंदे, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, महेंद गजरे, जगदीश घेटे, अँड. योगेश गजरे, पंकज वाघ, जयंती समिती अध्यक्ष संघरक्षक तायडे, उपाध्यक्ष अक्षय मशाने, सचिव अमोल तायडे, कोषध्यक्ष गोपाळ तायडे, राजेश शिंदे, नितीन पाटील, रवींद्र पाटील, बाळा आमोदकर, रमण तायडे, संघरत्न दामोदरे, राजेंद्र अटकाळे, बाळू शिरतुरे, राजू घेटे, पिंटू वाघ, सुनील शिरतुरे, दिपक नगरे यांचे सह उत्सव समितीचे सदस्य शहरातील नागरिक, बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी येथील आंबेडकर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लेझीम पथकासह सवाद्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

No comments