शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी मुक्ताईनगर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) भूसंपादनात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मो...
शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भूसंपादनात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी दोन महिन्यांपासून मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे .हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न प्रशासनाने रविवारी केला पण आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे व शेतकरी यांनी हा प्रयत्न हाणून पाडला .दोन दिवसात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले .इंदोर हैदराबाद 753 एल या रस्त्याच्या कामादरम्यान पुलाचे काम सुरू आहे .येथे शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे शासकीय दरानुसार जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. रविवारी सकाळी आंदोलन स्थळी पोलिसांचा फौज फाटा धडकला .ही माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे घटनास्थळी आले .दोघांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना धारेवर धरले .तर शेतकऱ्यांनी आमचे आंदोलन चिरडण्यासाठी एवढा फौज फाटा आणला का? असे प्रश्न विचारले .वाढता विरोध पाहता तात्काळ काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या प्रशासनाला नमते घ्यावे लागले. यावेळी मोठा फौज फाटा व यंत्रसामुग्री घेऊन आलेल्या प्रशासनाला माघारी जावे लागले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार एकनाथ खडसे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
No comments